अभिनेता सुरज पवारच्या कुटुंबीयांना मारहाण

0

अभिनेता सुरज पवार याच्या कुटुंबीयांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापुरातील करमाळा तालुक्यातील पोफळज या गावात मारहाणीची प्रकार घडला आहे. या प्रकरणी 8 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज पवार याने ‘सैराट’मध्ये आर्चीच्या भावाची म्हणजेच ‘प्रिन्स’ची भूमिका केली होती

सुरज पवारचे आजी-आजोबा, भाऊ-बहिणी पोफळज गावात राहतात. दोन दिवसांपूर्वी गावातील एका तरुणाला शेतातून येताना काही पारधी समाजाच्या लोकांनी मारहाण करुन लुटल्याची घटना घडली होती.

ही घटना सुरज पवार याच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या व्यक्तींकडून झाल्याच्या संशयाने गावातील आठ जणांनी घरात घुसून सुरजचे आजी-आजोबा आणि इतर कुटुंबीयांना मारहाण केली.

या घटनेनंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

LEAVE A REPLY

*