अनेक बॉलीवूड कलाकार ‘हृदयांतर’मधून करणार मराठीत पदार्पण

0
विक्रम फडणीसच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या ‘हृदयांतर’ चित्रपटाद्वारे अनेक बॉलिवूड मंडळी मराठी चित्रपटासाठी काम करणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फराह खान ‘हृदयांतर’मधील गाण्यांसाठी कॉरिओग्राफी करणार असल्याचे समजले. तसेच, अभिनेता हृतिक रोशनदेखील यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत असून आता बॉलिवूडमधील आणखी एक व्यक्ती या मराठी चित्रपटासाठी काम करणार असल्याचे समोर आले आहे.

अभिनेत्री करिना कपूरचा हेअर स्टाइलिस्ट पॉम्पी हा ‘हृदयांतर’ चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. जवळपास एका दशकापासून करिनासोबत काम करणाऱ्या पॉम्पीने ‘हृदयांतर’ चित्रपटातल्या मुख्य कलाकारांचा लूक डिझाइन केलाय. त्यासोबतच या चित्रपटात तो अभिनयदेखील करतोय.

पॉम्पी आणि विक्रम खूप जुने मित्र आहेत. त्यामुळेच तर विक्रमने पॉम्पीला जेव्हा मुख्य कलाकारांचा लूक डिझाइन करायला सांगितला तेव्हा तो यासाठी लगेच तयार झाला. या चित्रपटात तो एक विनोदी व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. ही भूमिका पॉम्पीनेच करावी असा विक्रमचा आग्रह होता.

LEAVE A REPLY

*