अनुदानित सिलिंडरची किंमत दर महिना 4 रुपयांनी वाढणार

0

केंद्र सरकारने अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत दर महिन्याला 4 रुपयांनी वाढवण्याचा आदेश पेट्रोलियम कंपन्यांना दिला आहे.

असे करून मार्च 2018 पर्यंत घरगुती गॅस सिलिंडरवर मिळणारी सूट संपवण्याचा सरकारचा उद्देश आहे.

सोमवारी लोकसभेत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, “गतवर्षी ऑइल कंपन्या सबसिडीवर मिळणाऱ्या सिलिंडर्स (14.2kg)च्या किमती दर महिन्याला 2 रुपयांनी वाढवण्याचा आदेश दिला होता. परंतु आता याला 4 रु. करण्यात आले आहे.” म्हणजेच पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत सिलिंडरची किंमत 32 रुपयांनी वाढेल.

LEAVE A REPLY

*