अटीतटीची लढाई होईल, तेव्हाच राजकारणातील प्रवेशाबद्दल भूमिका मांडेन : रजनीकांत

0

तामिळनाडूच्या कोदमबक्कम परिसरात रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांची भेट घेतली.

सुमारे आठ वर्षांनी हा सुपरस्टार चाहत्यांसोबत बोलत होता.

ते पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांशी असाच संवाद साधणार आहेत. पण त्याचं वेळापत्रक त्यांनी अजून तयार झालेलं नाही.

यावेळी त्यांच्या चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत होता तो म्हणजे ‘थलैवा’ राजकारणात कधी प्रवेश करणार? हा प्रश्न त्यांना विचारण्यातही आला. यावर उत्तर देताना रजनीकांत यांनी काहीसा होकार दिला नाही आणि नकारही… एका इंग्रजी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रजनीकांत म्हणाले की, ‘सध्या माझ्यावर काही जबाबदाऱ्या आहेत. काही कामं आहेत. तुमच्याबाबतीतही तसंच आहे. पण जेव्हा अटीतटीची वेळ येईल तेव्हा सर्वांनाच कळेल.’आपल्या तामिळ कनेक्शनबद्दल बोलताना रजनीकांत म्हणाले की, ‘माझ्या चाहत्यांनी मला ‘तामिझन’ बनवले. आयुष्याची २३ वर्षे मी कन्नडिगा होतो. पण, गेल्या ४४ वर्षांपासून मी तामिझन आहे. हे तुमच्यासारख्या चाहत्यांमुळेच शक्य झाले.’

LEAVE A REPLY

*