अक्षय-भूमीने घेतली रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंची भेट

0
अभिनेता आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या त्यांच्या आगामी ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याचनिमित्ताने मंगळवारी या दोन्ही कलाकारांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची दिल्लीत भेट घेतली आणि सिनेमाविषयी चर्चा केली. या भेटीची काही छायाचित्रे सुरेश प्रभू यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहेत.
अक्षयचा ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा सिनेमा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी अशा स्वच्छ भारत अभियानावर आधारलेला आहे. या सिनेमातून अक्षय प्रेक्षकांना स्वच्छतेचे धडे देताना दिसणार आहे.
सुरेश प्रभु यांनी त्यांच्या ट्विटमध्ये अभिनेता अक्षय कुमारचे कौतुक करताना लिहिले, ‘अक्षय कुमारची भेट घेणे हा सुखद अनुभव ठरला.
सिनेमाच्या माध्यमातून स्वच्छ भारताविषयी जागरुकता निर्माण करणा-या अक्षय कुमारचे मी कौतुक करतो.’ यापूर्वी अक्षयने या सिनेमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. यावेळी अक्षयच्या या सिनेमाचे नाव ऐकून मोदींना हसू आवरता आले नव्हते.
अक्षय आणि भूमीची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा येत्या 2 जूनला प्रदर्शित होतोय.

LEAVE A REPLY

*