अक्षय कुमार पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार!

0

सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहे.

‘खतरों के खिलाडी’ आणि ‘डेअर टू डान्स’ या टीव्ही शोला होस्ट केल्यानंतर अक्षय पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतण्यास तयार आहे.

यावेळेस अक्षय पुन्हा एकदा एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये बघावयास मिळणार आहे. या शोचे निर्माता अश्विनी यर्दी असणार आहे.

अश्विनीने ‘ओ माय गॉड’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हा शो टॅलेण्ड बेस्ड असणार आहे. ज्यामध्ये अक्षय जजच्या भूमिकेत असेल.

सध्या या शोची तयारी सुरू असून, अक्षय आपल्या बिझी शेड्युल्डमधून शूटिंगला वेळ देण्याचा प्रयत्न करीत आहे.

सध्या अश्विनी कलर्स या चॅनेलशी जोडलेली असल्याने हा शोदेखील याच चॅनेलवर दाखविला जाण्याचा शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*