अंतराळात जाणारी पहिली ‘महिला’ असावी; जीएसएलव्ही-एमके 3 पहिल्या प्रक्षेपणासाठी सज्ज

0
श्रीहरीकोटा : ‘जीएसएलव्ही-एमके 3’च्या पहिल्या प्रक्षेपणाची तयारी भारतीय अ‍वकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सुरू केली आहे. संपूर्ण भारतीय बनावटीचा आतापर्यंतचा सर्वाधिक वजनाचा प्रक्षेपक अशी जीएसएलव्ही-एमके 3 अशी ओळख आहे.

‘जीएसएलव्ही-एमके 3’च्या पहिल्या प्रक्षेपणाची तयारी भारतीय अ‍वकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सुरू केली आहे. संपूर्ण भारतीय बनावटीचा आतापर्यंतचा सर्वाधिक वजनाचा प्रक्षेपक अशी जीएसएलव्ही-एमके 3 ची ओळख आहे.

आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथे त्यासाठीचे काम सुरू असून या प्रक्षेपकाद्वारे जास्त वजनाचे उपग्रह अकाशात सोडता येणार आहेत.

भविष्यात या प्रक्षेपकाद्वारे अंतराळवीरांना घेऊन अंतराळात सोडण्याची योजना ‘इस्रो’ने तयार केली आहे. यात यश आले तर मानवाला अंतराळात धाडण्याची वैज्ञानिक क्षमता असलेला भारत हा रशिया, अमेरिका व चीननंतर जगातील चौथा देश ठरणार आहे. ‘जीएसएलव्ही-एमके-3’ प्रक्षेपकाचे वजन 640 टन आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये :

* चार टन वर्गातील उपग्रह अवकाशात सोडण्याची या प्रक्षेपकाची क्षमता आहे.

* नव्या प्रक्षेपकाच्या निर्मितासाठी 300 कोटी रुपयांचा खर्च.

* सध्या अशा उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी फ्रान्सच्या आरियान-5 रॉकेटचा वापर भारत करतो.

8 भारताने आत्तापर्यंत विकसित केलेल्या मोठ्या अग्निबाणांमध्ये या नव्या अग्निबाणाची उंची सर्वात कमी म्हणजे 43 मीटर आहे.

8 या अग्निबाणाचे डिझाईन रुबाबदार असून दोन ‘एसयूव्ही’ मोटारींएवढे वजन अंतराळात घेऊन जाण्याची त्याची क्षमता असेल.

* याचा पहिला टप्पा आणि त्याला संलग्न असलेले ‘स्टार्ट-अप बूस्टर’ महाकाय असून त्यांचे वजन 610 टन आहे.

* याच्या दुसऱ्या टप्प्यात भारताने पूर्णपणे देशात तयार केलेले 30 टन वजनाचे अभिनव असे ‘क्रायोजनिक इंजिन’ आहे.

* 15 वर्षांच्या अथक मेहनतीनंतर हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले.

LEAVE A REPLY

*