अंकुश चौधरीचा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0

 

अंकुश ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटानंतर एका नव्या चित्रपटात काम करण्यास सज्ज झाला आहे.

अंकुशच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली असून वायकॉम 18 मोशन पिक्चर्स या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

क्लासमेट या चित्रपटात अंकुश चौधरीने प्रमुख भूमिका साकारली होती तर या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले होते.

आदित्य आणि अंकुश यांची जोडी नव्या चित्रपटात पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अंकुशच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करत असून हा चित्रपट 29 सप्टेंबर 2017ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अंकुशची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे नाव काय असणार यावर चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे.

अंकुशच्या या आगामी चित्रपटाचे लेखन उपेंद्र सिद्धये यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*